‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर. उत्तम अभिनय आणि हॉटनेसमुळे वाणी कायम चर्चेत असते. ‘वॉर’ चित्रपटातील तिचा हॉट लूक प्रचंड चर्चेत आला होता. वाणी अनेक वेळा इन्स्टाग्रामवरही तिचे असेच बोल्ड आणि कुल लूक शेअर करत असते. मात्र यावेळी तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. इतकंच नाही तर काही नेटकऱ्यांनी धर्माचा आदर कर असा सल्लाही दिला आहे.
वाणीने नव्या लूकमधील एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र या फोटोमध्ये तिने जे कपडे घातले आहेत त्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये वाणीने तंग कपडे परिधान केले असून त्यावर ‘हे राम’ नावाची प्रिंट आहे. तिचे हे कपडे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं. अनेकांनी तिला ट्रोलदेखील केलं.
“थोडी तरी लाज बाळग श्री रामांचं नाव लिहिलेले कपडे घातले आहेत”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, “आजपर्यंत मी तुमच्या कोणत्याच फोटोवर कमेंट केली नाही किंवा आजही मी तुम्हाला ट्रोल करत नाही. मात्र मॅडम कृपया असे कपडे घालून आपल्याच धर्माची चेष्टा करु नका”, असं अन्य एका युजरने म्हटलं आहे.
“नाव रामाचं पण काम मात्र रावणाचं” असंही काहींनी म्हटलं आहे. तर, “तू जे काही कपडे परिधान केले आहेस त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो”, असंही एकाने म्हटलं आहे.
दरम्यान, ‘शुद्ध देसी रोमान्स’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी वाणी कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते. ‘शुद्ध देसी रोमान्स’नंतर ती ‘वॉर’ आणि ‘बेफिक्रे’ या चित्रपटातही झळकली आहे.