बॉलिवूडमधील अभिनेत्री कायमच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. यामध्ये त्यांच्या फॅशनची कायमच चर्चा होत असते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेक वेळा सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. त्याप्रमाणे यावेळीही तिने एका फोटोशूटचे काही फोटो ने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र या फोटोवर अभिनेता वरुण धवनने केलेल्या कमेंटमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वरुण धवन कायमच त्याच्या मजेशीर कमेंटमुळे चर्चेत येत असतो. वरुण अनेक वेळा त्याच्या मित्रपरिवाराच्या पोस्टवर मजेशीर कमेंट करत असतो. त्याप्रमाणेच यावेळीही त्याने सोनाक्षीच्या फोटोवर अशीच मजेशीर कमेंट केली आहे. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोला वरुणने भाभी असं म्हटलं आहे.

सोनाक्षीने काही दिवसापूर्वी एक फोटोशूट केलं होतं. एका फोटोमध्ये ती बोल्ड आणि बिंधास्त अंदाजात दिसून येत आहे. मात्र तरीदेखील वरुणने हा फोटो पाहून तिला भाभी असं संबोधलं. विशेष म्हणजे वरुणची ही कमेंट वाचताच सोनाक्षीदेखील आता लग्नाच्या बेडीत अडकणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, वरुणची ही कमेंट पाहताच सोनाक्षीने त्याला मजेशीर अंदाजात उत्तर देत ‘तोंड बंद ठेव’ असं सांगितलं. त्यामुळे दोघांनी केलेल्या या कमेंट मस्करीचाच एक भाग असल्याचं दिसून येत आहे. मात्र या कमेंट जरी मजेचा एक भाग असला तरी सोनाक्षी लवकरच लग्न करु शकते अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून बंटी सचदेव आणि सोनाक्षीच्या नात्याविषयी चर्चा सुरु आहेत. मात्र त्यांचं हे नातं सोनाक्षीच्या आईला मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.