News Flash

Coolie no. 1 trailer : गोविंदा की वरुण? ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा कोण आहे ‘कुली नं. १’

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनने त्याचा रिमेक करण्यात निर्णय घेतला होता. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता प्रेक्षकांना कुली नंबर १च्या भूमिकेत गोविंदा आवडतो की वरुण धवन हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.

‘कुली नंबर १’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच १ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ३ मिनिटं १५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये वरुण धवन आणि साराची केमिस्ट्री पाहायला मिळते. दरम्यान चित्रपटात साराच्या वडिलांची भूमिका परेश रावल यांनी साकारली असल्याचे दिसत आहे. परेश रावल हे त्यांच्या मुलीसाठी (सारासाठी) अतिशय श्रीमंत मुलगा शोधत असतात. तेव्हा त्यांची भेट वरुण धवनशी होते. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

वरुणने चित्रपटाचे एक पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे पोस्टर पाहता तो चित्रपटात पाच वेगवेगळे रोल करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नंबर १’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 1:13 pm

Web Title: varun dhawan and sara ali khan coolie no 1 trailer released avb 95
Next Stories
1 मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदित्य नारायण करणार मंदिरात लग्न
2 हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; आहानाने दिला जुळ्या मुलींना जन्म
3 मराठी अभिनेत्रीचा विदेशात डंका; नेहा महाजन-रिकी मार्टिनच्या म्युझिक अल्बमला ‘ग्रॅमी नॉमिनेशन’
Just Now!
X