News Flash

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांना ‘जीवनगौरव’

झी नाटय़गौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांना या वर्षी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नाटय़सृष्टीत मानाचा समजल्या जाणाऱ्या झी नाटय़गौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांना या वर्षी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेली अनेक दशके कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या बाळ कर्वे यांनी विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नाटय़प्रवासाची सुरुवात केली. लालन सारंग यांच्याबरोबर ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, भक्ती बर्वेबरोबर ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, डॉ. गिरीश ओकांबरोबर ‘कुसूम मनोहर लेले’ अशी नाटके केली. रंगभूमीवरचा त्यांचा हा आजवरचा प्रवास अविस्मरणीय ठरला. भारतीय टीव्ही मालिकांची नांदी देणारी चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणराव’ या मालिकेत त्यांनी गुंडय़ाभाऊंची भूमिका छोटय़ा पडद्यावर साकारली होती. हाती विनोदाचा सोटा घेऊ न गुंडय़ाभाऊ ने रसिकांच्या मनावर कब्जा मिळवला. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी साकारलेला गुंडय़ाभाऊ. खरंतर या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे नाव विचारात होते, पण काही कारणाने हे घडले नाही आणि ही भूमिका बाळ कर्वे यांना मिळाली. त्यांनी ती भूमिका अजरामर केली.

लोकप्रिय नाटकांचे निवडक प्रवेश, बहारदार नृत्याविष्कार आणि विनोदी प्रहसने यांनी रंगलेला हा नाटय़गौरव सोहळा येत्या ८ एप्रिलला झी मराठीवर सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 2:14 am

Web Title: veteran actor bal karve get lifetime achievement awards
Next Stories
1 इंग्लिश विंग्लिश : प्रायोगिक भीती..
2 वेबवाला : सूडनाटय़ आणि बरेच काही..
3 अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर प्रदर्शनापुर्वीच सुपरहिट
Just Now!
X