X
X

लॉकडाउनमध्ये दारु न मिळाल्याने अभिनेत्रीच्या मुलाने घेतल्या झोपेच्या गोळ्या ?

एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत

करोना व्हायरसचा वाढचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये दिवंगत दाक्षिणात्य अभिनेत्री मनोरमा यांचा मुलगा भूपतीने दारु न मिळाल्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या. या गोळ्यांचा ओवरडोस झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

लॉकडाउनमुळे संपूर्ण देशात दारुची दुकाने आणि बंद  ठेवण्यात आले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मनोरमा यांचा मुलगा भूपतीला दारुचे व्यसन आहे. पण लॉकडाउनमुळे दारु न मिळाल्याने त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत. या गोळ्यांचा ओवरडोस झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्याच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि मनोरमाच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

मनोरमा यांनी १५०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर ५००० स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत. तसेच त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

21
X