News Flash

Photo : उधम सिंग यांच्या भूमिकेतील विकी कौशल

त्याचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हारल झाला आहे

विकी कौशल

‘मसान’, ‘राजी’, ‘संज्जू’, ‘मनमर्जिया’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ या चित्रपटांतून अभिनेता विकी कौशलने बॉलिवूडमध्ये एक वेगळीच छाप उमटवली आहे. या चित्रपटांनंतर तर त्याचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे. या चित्रपटांच्या यशानंतर विकीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. विशेष म्हणजे विकी लवकरच चित्रपट दिग्दर्शक शूजित सरकार यांच्या आगामी ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटात झळकणार आहे. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘सरदार उधम सिंग’ चित्रपटातील उधम सिंग यांची भूमिका साकारणाऱ्या विकीचा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये विकी क्लिन शेव्हमध्ये दिसत आहे. त्याचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हारल झाला आहे. आता पर्यंत विकीच्या शेव्ह लूकवर अनेक तरुण-तरुणी फिदा होते. पण उधम सिंग मधील विकीचा हा वेगळा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘सरदार उधम सिंग’ हा चित्रपट १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. त्यावेळी जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या मायकेल ओ’डॉयरची हत्या उधम सिंग यांनी केली होती. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे. विकीचा हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, उधम सिंगमध्ये विकीपूर्वी इरफान खान झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे इरफाननेच या चित्रपटासाठी नकार दिला. त्याचप्रमाणे अभिनेता रणबीर कपूरदेखील या चित्रपटामध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:06 pm

Web Title: vicky kaushal first look from udham singh
Next Stories
1 उच्चशिक्षित मंत्री असतांनाही पाण्याचं नियोजन नाही – अण्णा हजारे
2 ऋषी कपूर कॅन्सरमुक्त; दिग्दर्शक राहुल रवैल यांची माहिती
3 आलिया भट्टला ‘हा’ अभिनेता वाटतो रणबीरपेक्षा हॅण्डसम?
Just Now!
X