25 November 2020

News Flash

वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल फक्त काळालाच कळते

ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री?

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी आता विक्की वेलिंगकर या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!” अशा आशयाचे ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर झाले प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असुन हा चित्रपट येत्या ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने आजवर नटरंग, हाय काय नाय काय, अजिंठा, मितवा यांसारख्या चित्रपटांमधून अनेक रोमँटिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. परंतु ‘विक्की वेलिंगकर’मध्ये ती अॅक्शन भूमिकेत दिसणार आहे. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा आहे. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात संकटांवर मात करणाऱ्या एका खंबीर नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:41 pm

Web Title: vicky velingkar sonalee kulkarni mppg 94
Next Stories
1 …म्हणून लग्नानंतरही १२ वर्षे मंदिरा बेदी होऊ शकली नाही आई
2 Video: बॉडीगार्डशी उद्दामपणे वागणाऱ्या आलियावर नेटकरी भडकले
3 Video : ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X