आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. लवकरच विद्याचा ‘शेरनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्याने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणास देखील सुरुवात करण्यात आली होती. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले होते. आता पुन्हा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. मध्ये प्रदेशमधील जंगलात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या बालन ‘शेरनी’ या चित्रपटात एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच हा चित्रपट जून महिन्यात अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विद्यासोबत अभिनेता शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार दिसणार आहेत.

‘शेरनी’ या चित्रपटाची निर्मिती टी सिरीजचे भूषण कुमार यांनी केली आहे. या विषयी बोलताना ते म्हणाले की, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांकरिता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी आनंदी आहे.”