News Flash

ऐकावं ते नवलच! रजनीकांत यांच्या नावाचा असाही वापर

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते चित्रपट आणि राजकीय कारकिर्द कशी सांभाळणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात होता.

रजनीकांत, rajinikanth

सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवलं, ज्यानंतर आता रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र झाले आहेत. कार्तिक सुब्बाराज यांच्या चित्रपटासाठी रजनीकांत आता जास्त वेळ देत असून, सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम दार्जिलिंग येथील कर्सेओंग येथे आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते चित्रपट आणि राजकीय कारकिर्द कशी सांभाळणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण, आता मात्र त्यांनी या दोन्ही गोष्टींमध्ये चांगलाच समतोल राखला असल्याचं कळत आहे. दरम्यान, या अभिनेत्याच्या लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. चाहत्यांचं अमाप प्रेम मिळणाऱ्या रजनीकांत यांना पुन्हा एकदा या साऱ्याचा प्रत्यय आला आहे. कर्सेओंग येथे चित्रीकरणादरम्यान, ते अल्लिता हॉटेल्स अँड रिसॉर्ट येथे दहा दिवसांसाठी राहिले होते. या रिसॉर्टमध्ये असणाऱ्या दिग्दर्शकाच्या बंगल्यात ते थांबल्याची माहती सुत्रांनी दिली होती.

Allita Hotel Allita Hotels & Resorts

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?
रजनीकांत ज्या बंगल्यात थांबले होते, त्या ठिकाणाला आता त्यांच्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं आहे. या महान अभिनेत्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून आता त्या बंगल्याचं नाव ‘रजनीकांत व्हिला #3’ असं ठेवण्यात आलं आहे. बंगल्याची नवी ओळख सर्वांसमोर आणल्यानंतर त्या दिवशी वृक्षारोपणही करण्यात आलं. इतकच नव्हे तर, त्या रिसॉर्टमधील रजनीकांत यांच्या आवडत्या चहालाही ‘थलैवा स्पेशल’ असं नाव देण्यात आलं आहे. Allita Hotels & Resortsच्या संचालकपदी असणाऱ्या मेहुल पारेख यांनी हे आपल्या हॉटेलचं एक प्रकारे यश असल्याचं म्हणत रजनीकांत आपल्या हॉटेलमध्ये थांबल्याविषयीचा आनंद व्यक्त केला. त्याशिवाय त्यांच्यावर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 2:06 pm

Web Title: villa named after visit of kaala fame actor superstar rajinikanth
Next Stories
1 हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे मी लोकांच्या हाती आयतं कोलीत दिलं- स्वरा भास्कर
2 रणबीर आलियालाही फसवणार, कतरिनाला वाटतेय भीती
3 प्रियांका- निक जोनास लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये?
Just Now!
X