News Flash

कपिलची जागा घेणार हा कॉमेडियन? ट्विटरवर दिलं स्पष्टीकरण

कपिलनं वारंवार 'फॅमिली टाइम..'चं चित्रिकरण रद्द केलं आहे. आता या शोसाठी कपिलऐवजी स्टँडअप कॉमेडियन वीर दासचं नाव चर्चेत होतं.

कपिल नैराश्येतून बाहेर येईपर्यंत वीर दास हा शो सुरू ठेवेल अशी चर्चा होती.

कपिल शर्माऐवजी ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या शोसाठी स्टँडअप कॉमेडियन वीर दासचं नाव चर्चेत होतं. कपिलचा नवा कोरा शो गेल्या महिन्यात सुरू झाला. प्रेक्षकांना कपिलच्या शोबद्दल खूपच उत्सुकता होता. पण, यावेळी मात्र प्रेक्षकांच्या पदरी चांगलीच निराशा पडली. त्यातून कपिलचा शो महिनाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही सुत्रांनी सांगितलं. आता याला वेगळं वळण लाभलं असून कपिल नैराश्येतून बाहेर येईपर्यंत वीर दास हा शो सुरू ठेवेल अशी चर्चा होती, अखेर या चर्चेवर शांत असलेल्या वीरनं आपलं मौन तोडलं आहे.

वाचा : ‘माझी बदनामी करून त्यांना समाधान मिळतं’

कपिलची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आतापर्यंत कपिलनं त्याच्या शोमधून खूप प्रसिद्धी कमावली आहे. लोकांच्या मनात त्यानं घर केलंय. त्याची जागा मीच काय कोणाही घेऊ शकत नाही. मी कपिलऐवजी त्या शोमध्ये काम करत नाही हेच मला स्पष्ट करायचं आहे. असं ट्विट करून वीरनं साऱ्या चर्चा थांबवल्या आहेत. वीर स्टँडअप कॉमेडिअन म्हणून प्रसिद्ध आहे. वीरनं छोट्यापडद्यावर अनेक शोमध्ये काम केलंय. त्याच्या वेबसीरिजही आहेत त्यामुळे कपिलची जागा तो घेऊ शकतो अशी चर्चा होती. पण अखेर फॅमिली टाइम करण्याची आपली इच्छा नाही हे वीरनं स्पष्ट करत साऱ्या चर्चा थांबवल्या आहेत.

वाचा : ‘कृपा करून कपिलला एकटं सोडा’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 1:31 pm

Web Title: vir das says he is not taking over family time slot
Next Stories
1 डिसेंबरमध्ये दुसरे लग्न करणाऱ्या रघुरामला पहिल्या पत्नीने दिला ‘हा’ संदेश
2 65th national film awards : हे तर प्रसाद ओकचंच श्रेय – सोनाली कुलकर्णी
3 ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘कच्चा लिंबू’ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
Just Now!
X