सध्या करोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. सामान्यांपासूने ते दिग्गजांपर्यंत अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे पाहायाला मिळाले. चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकरांना करोनाचा संसर्ग झाला. कलाकार चित्रीकरणास सुरुवात करण्यापूर्वी करोना चाचणी करुन घेत असल्याचे दिसत आहे. ते करोना चाचणी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. हे व्हिडीओपाहून कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासने कलाकरांना सुनावले आहे.

नुकताच वीर दासने ट्विटच्या माध्यमातून करोना चाचणी करतानाचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. ‘कलाकारांनी त्यांच्या करोना चाचणी करतानाचे व्हिडीओ पोस्ट करणे बंद केले पाहिजे. तुमच्यापासून एक फूट अंतरावर पीपीई किटमध्ये उभी असणारी व्यक्ती अनेकांच्या घरी जाऊन दिवसभरात ३० वेळा हे काम करत असेल. केवळ तुम्हीच संघर्ष करीत नाहीत’ या आशयाचे ट्विट वीर दासने केले आहे.

पाहा फोटो: २५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील आलिशान बंगल्यात

त्यानंतर वीर दासने आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने गेल्या काही माहिन्यांपासून मी हे व्हिडीओ पाहात आहे. तुमचे व्हिडीओ पाहून अनेकांना चाचणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असेल या आशयचे दुसरे ट्विट केले आहे. त्याचे हे दोन्ही ट्विट सध्या चर्चेत आहेत.