बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये कलाकरांमध्ये वादविवाद कायमच होत असतात. मात्र हे वाद फार काळासाठी टिकून राहत नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळला आहे. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्याबाबतीत घडला आहे.


काही दिवसांपूर्वी मनीष मल्होत्राच्या ‘मिजवान फॅशन शो’ मध्ये रणबीर आणि दीपिकाने एकत्र रॅम्पवॉक केला. शोच्या निमित्ताने रणबीर आणि दीपिकाच्या नात्यामध्ये दुरावा थोड्या प्रमाणात कमी होऊन त्यांना एकत्र पाहता आले.
‘मिजवान फॅशन शो’ मधला एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये रणबीर आणि दीपिका एकमेकांशी मनमुराद गप्पा मारताना दिसून येत आहेत. तर अभिनेत्री शबाना आझमी माध्यमांसह चर्चा करत आहेत. मात्र रणवीर आणि दीपिकाचे प्रसारमाध्यमे किंवा अन्य कोणाकडेही लक्ष नसल्याचे आढळून आले.

https://www.instagram.com/p/Bh6Sp-1jEXo/


दिपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केल्यापासून ते चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.  या  ‘फॅशन शो’ पूर्वी रणवीर आणि दीपिका तमाशा चित्रपटात एकत्र झळकले होते.