हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये गुरु – शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरु आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरु – शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगिताची अविस्मरणीय, अद्भूत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे. अशी माहिती प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’

मिराज क्रिएशन्स आयोजित, राहुल रानडे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेली ‘विरासत’ ही अनोखी संगीत मैफल येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. महालक्ष्मी लॉन्स , डी.पी. रस्ता, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे होईल. यात रक्ताचे नाते असण्याबरोबरच गुरु – शिष्य असे नाते असलेल्या सुप्रसिद्ध अशा ८ ज्येष्ठ कलावंताची एकाच व्यासपीठावर होणार्‍या एकत्रित सादरीकरणाची अनुभूती रसिकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमात दोन ग्रॅमी व पद्मभूषण पुरस्कर्त्यांचे वादन एकाच रंगमचावर ऐकण्याची दुर्मिळ संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘विरासत’ मध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध घट्टंम वादक पद्मभूषण विक्कू विनायकराम व त्यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि ज्येष्ठ वादक तैफिक कुरेशी – प्रसिद्ध तबलावादक ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध बंधू समाविष्ट होणार आहेत, शिवाय प्रसिद्ध वादक लुई बॅंक्स – जिनो बॅंक्स ही पिता – पुत्रांची जोडी, कर्नाटकचे प्रसिद्ध व्हायोलीन वादक गणेश – कुमरेश हे दोघे भाऊ असले तरी त्यांच्यात गुरु – शिष्य नाते आहे, अशा कलावंतांचा समावेश आहे. यातील गुरु – शिष्यांचे एकत्रित सादरीकरण अनेकदा बघायला मिळते मात्र चार गुरु – शिष्य, बंधू, पिता – पुत्र अशा जोड्यांचे एकाच वेळी सादरीकरण हे ‘विरासत’चे खास वैशिष्ट्य असून असा दुर्मिळ योग पहिल्यांदाच घडणार आहे.

Review : स्वतःच्या चुका शोधायला लावणारा ‘आपला मानूस’

‘विरासत’ विषयी अधिक माहिती देतांना राहुल रानडे म्हणाले की देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात होत असलेली ‘विरासत’ ही फक्त सांगीतिक मैफल नाही तर यातून आपली पुणेरी परंपरा उलगडणार आहे. मुख्य रंगमंचाला शनिवारवाड्याचा लुक असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर नऊवारी साडीतील स्वागतिका संगीत मैफलीला येणाऱ्या संगीत रसिकांचे स्वागत करणार आहेत. येथील सजावट आणि एकूण प्रकाशयोजना अस्सल भारतीय संगीत परंपरेला साजेशी असणार आहे. निवेदनातही ‘विरासत’ जपलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन गाडगीळ ही पिता – पुत्राची जोडी करणार आहे.