30 November 2020

News Flash

अनुष्कासाठी विराटनं लिहिला खास संदेश

आपल्या पत्नीचं तोंडभरून कौतुक विराटनं या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केलं आहे.

विराट- अनुष्का

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासाठी इन्स्टाग्रामवर एक छानसा संदेश लिहिला आहे. विराटची ही इन्स्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या पत्नीचं तोंडभरून कौतुक विराटनं या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केलं आहे. आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यात तिनं मला वाट दाखवली असं म्हणत अनुष्काचा फोटो विराटनं शेअर केला आहे.

‘प्रत्येक संकटात तिनं मला योग्य मार्गदर्शन केलं. कठीण प्रसंगात ती माझ्या पाठीशी उभी राहिली. तिनं माझं आयुष्य पुर्णपणे बदललं खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवायला तिनं मला शिकवलं. ती माझी ताकद आहे’ असं म्हणत विराटनं अनुष्काचं कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 6:48 pm

Web Title: virat kohli appreciates anushka sharma in his inta post
Next Stories
1 ‘भजन सम्राट’ अनुप जलोटा यांची एफटीआयआयच्या संचालकपदी नियुक्ती
2 डिंको सिंगच्या बायोपिकसाठी शाहिदच्या निवडीवर अनेकजण नाराज
3 १६ व्या वर्षी बॉयफ्रेंडनं केला बलात्कार, प्रसिद्ध अभिनेत्रीचा ३२ वर्षांनंतर गौप्यस्फोट
Just Now!
X