बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांची जोडी नेहमीच अनेकांच्या चर्चेचा विषय असते. लग्नापासून लाईमलाईटमध्ये राहणारी ही जोडी अनेकवेळा एकत्र वेळ घालवत असतात. त्यामुळे या जोडीने एका रेस्टॉरंटला भेट दिली असून त्याचे काही फोटो विराटने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसापूर्वी विराट आणि अनुष्का आपल्या कुटुंबीयांसह नुएवा या रेस्टरंटमध्ये डिनरला गेले होते. विशेष म्हणजे येथील जेवण विराटला प्रचंड आवडलं असून त्याने या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या असं म्हटलं आहे.

‘नुएवामध्ये जे जेवण मिळतं त्याची चव अन्य कोठेच मिळू शकत नाही. त्यामुळे जर काही तरी भन्नाट खायची इच्छा असेल तर या रेस्टॉरंटला नक्कीच भेट द्या. आणि खवय्यांनी तर चिमिचुरी मशरुम्स नक्कीच खाऊ बघा’, असं विराटने म्हटलं.

दरम्यान, विराटने त्याच्या ट्विटरवर आपल्या कुटुंबीयांसमवेतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराटबरोबर, अनुष्का, त्याचा भाऊ विकास कोहली , वहिनी चेतना आणि अन्य एक दाम्पत्य दिसून येत आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli dines with anushka sharma at his nueva restaurant
First published on: 24-09-2018 at 11:35 IST