18 January 2021

News Flash

लॉकडाउनच्या काळात सेहवाग पाहतोय ‘ही’ पौराणिक मालिका

मालिका पाहणाऱ्या सेहवागचा व्हिडीओ व्हायरल

विरेंद्र सेहवाग म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येत? तर चौकार, षटकारांचा पाऊस. कधीकाळी क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांची धुलाई करणारा सेहवाग देखील सध्या लॉकडाउनमुळे घरात कैद झाला आहे. मात्र या लॉकडाउनच्या काळात तो घरात बसून करतोय तरी काय? याचे उत्तर स्वत: सेहवागने एक व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे.

विरेंद्र सेहवाग आपल्या कुटुंबियांसोबत ‘राधेकृष्ण’ ही मालिका पाहतोय. स्टार प्लसवरील या लोकप्रिय मालिकेला पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे. या मालिकेचे पुर्नप्रक्षेपण रोज सध्याकाळी ७ वाजता स्टार प्लस वाहिनीवर केले जाते. ही मालिका पाहून सेहवाग आपला वेळ घालवत आहे.

‘राधाकृष्ण’ या मालिकेचे पहिले पर्व २०१८मध्ये स्टारप्लस वाहिनीवर दाखवले जात होते. ही मालिका भगवान कृष्ण यांच्या पौराणिक कथांवर आधारित आहे. या मालिकेत अभिनेता सुमेध मुद्गलकर याने कृष्ण ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर राधेच्या भूमिकेत अभिनेत्री मल्लिका सिंह झळकली होती. अफलातून कथानकामुळे ही मालिका सुपरहिट झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 4:04 pm

Web Title: virender sehwag watching radhakrishn serial coronavirus lockdown mppg 94
Next Stories
1 Video : ‘.. तो जिंदा हो तुम’; कवितेतून फरहान अख्तरने दिला संदेश
2 VIDEO : नाराज मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस आले घरी
3 मराठी गाण्यावर खळखळून हसवणारा शिल्पाचा टिक-टॉक व्हिडीओ पाहिलात का?
Just Now!
X