News Flash

pataakha Trailer : भारत- पाकिस्तान होणार का एक; ‘पटाखा’मध्ये सख्ख्या बहिणी पक्क्या वैरीणींची कथा

दोन बहिणींची धम्माल कथा 'पटाखा'च्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.

pataakha Trailer

‘स्वातंत्र्य दिना’चं निमित्त साधून बॉलिवूडमधल्या दोन महत्त्वाच्या चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे यातला एक चित्रपट म्हणजे ‘पटाखा’ होय. सख्ख्या बहिणी पण पक्क्या वैरी असलेल्या दोन बहिणींची धम्माल कथा ‘पटाखा’च्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ‘दंगल’ फेम सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान सर्वात हटके अंदाजात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

एकमेकींना सदैव पाण्यात पाहणाऱ्या दोन बहिणींची धम्माल कथा ‘पटाखा’मध्ये पाहायला मिळणार आहे. राजस्थानातल्या लहानश्या खेड्यात राहणाऱ्या दोन मुलींची कथा विशाल भारद्वाज यांनी रुपेरी पडद्यावर आणली आहे. या चित्रपटात सुनील ग्रोवरही पाहायला मिळणार आहे. भारत पाकिस्तान होणार का एक? असे एकापेक्षा एक डायलॉग आणि  विशाल भारद्वाज यांच्या खास शैलीत तयार झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

चरण सिंह पाठिक यांच्या ‘दो बहनें’ कथेवर हा चित्रपट आधारित आहे. २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 1:13 pm

Web Title: vishal bhardwaj film pataakha trailer
Next Stories
1 Independence Day 2018: ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, सेलिब्रिटींचा स्वातंत्र्यदिन
2 CONTROVERSIAL : ‘नमस्ते इंग्लंड’ वादाच्या भोवऱ्यात; दाखवला भारताचा चुकीचा नकाशा
3 प्रियांकाला भेटण्यासाठी निक जोनास सहकुटुंब येणार भारतात
Just Now!
X