News Flash

..म्हणून दिव्यांकाच्या बचावासाठी विवेक आला धावून!

गेल्या काही दिवसापासून दिव्यांकावर चाहत्यांनी टिकेची झोड उठवली आहे.

विवेक-दिव्यांका

‘ये है मोहब्बते’ मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हे नाव सर्वपरिचित आहे. अगदी कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये दिव्यांकाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. त्यामुळे लोकप्रियतेचा मुकूट मिरविणा-या दिव्यांकाची अनेक वेळा चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. मात्र, गेल्या काही दिवसापासून दिव्यांकावर चाहत्यांनी टिकेची झोड उठवली आहे. दिव्यांकाबाबत नेटक-यांमध्ये होत असलेल्या चर्चेवर दिव्यांकाच्या नव-याने विवेकने मौन सोडले असून त्याने ट्रोल क-यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

काही दिवसापूर्वी दिव्यांकाने एका मालिकेच्या सेटवरील विवेकबरोबरचा  व्हिडिओ शेअर केला होता. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिव्यांका-विवेक यांच्या नात्यातील प्रेम,विश्वास हे भाव दिसून येत होते. हा व्हिडिओ काही नेटक-यांच्या पसंतीत  उतरला.तर  काही नेटक-यांनी दिव्यांकाला उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. हे प्रश्न ऐकताच दिव्यांकाच्या रागाचा पारा चढला आणि तिनेदेखील ट्रोलक-यांना प्रत्युत्तर दिले.मात्र हा वाद पुढे वाढ गेल्याने विवेकला मध्ये हस्तक्षेप करावा लागला.

दिव्यांकाने सेटवरील एक साधासा फोटो शेअर केला होता. मात्र हा फोटो पाहताच एका नेटक-याने तिला काही प्रश्न विचारले. ‘दरवेळी दिव्यांकाचं विवेक आणि तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. मात्र आतापर्यत विवेकने फार क्वचित वेळा दोघांचे फोटो शेअर केले आहेत. त्यांमुळे विवेक खरंच दिव्यांकावर प्रेम करतो कि फक्त दिव्यांकाच विवेकवर एकतर्फी प्रेम करते’, असा प्रश्न एका नेटक-याने दिव्यांकाला विचारला होता.  त्यावर दिव्यांकानेही रागाच्या भरात नेटक-याला सडेतोड उत्तर दिले. यामुळे ट्रोलकरी आणि दिव्यांकामध्ये वाद सुरु झाले. या वादावर पडदा टाकण्यासाठी विवेकने यात उडी घेत प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केल्याचं जागरण डॉट कॉमच्या माहितीनुसार दिसून येत आहे.

‘दिव्यांकाला फोटो, व्हिडिओ काढणं आणि  ते शेअर करणं या गोष्टी प्रचंड आवडतात. मात्र याबाबतीत मी थोडा अरसिक आहे. त्यामुळे माझ्याकडून फोटोचे वैगरे शेअरिंग फार कमी वेळा होते. परंतु त्याचा असा अर्थ नाही की माझं दिव्यांकावर प्रेम नाही. माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ट्रोलक-यांनादेखील हे समजायला हवं की प्रत्येक व्यक्ती एक सारखी नसते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे तिच्यावर सुरु असलेले टिकास्त्र आता बंद करा’,असं विवेकने ट्रोलक-यांना सांगितलं.

दरम्यान, विवेकने दिलेल्या उत्तरामुळे नक्कीच आता ट्रोलक-यांची तोंड बंद झाली असतील यात शंका नाही. विवेक लवकरच ‘कयामत से कयामत’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत त्याच्याबरोबर करिश्मा तन्ना आणि दीपिका कक्कड स्क्रिन शेअर करणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 5:48 pm

Web Title: vivek dahiya fitting reply to divyanka trollers
Next Stories
1 सारा खानचा न्यूड व्हिडिओ चुकून सोशल मीडियावर पोस्ट
2 ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारचं इन्स्टाग्रामवर पदार्पण
3 Top 5: ‘या’ पंजाबी अभिनेत्री टाकतील दीपिका- कतरिनाला मागे
Just Now!
X