प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात एखाद्या सोहळ्या रुपात यंदाचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत असले तरीही बाप्पाच्या सानिध्यात होत असलेल्या कार्यक्रमात गाण्याची संधी माझ्यासाठी स्पेशल आहे.  दिवाळीचा पारंपारिक फराळ असला तरीही एखाद्या वेगळ्या पदार्थाची फर्माईश असतेच म्हणूनच यावेळी फराळ अधिक काजू रोल आणि मटार सामोसे यांची खास मेजवानी असणार आहे. आम्ही घरची सगळी मंडळी घरी एकत्र सण साजरा करतो. त्यातही आमच्याकडे चोपडी पूजनाची प्रथा असल्यामुळे मी आणि माझी जाऊ दोघी न चुकता लक्ष्मी पूजनासाठी त्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मीचा फोटो रंगवून त्याची पूजा करतो. हे वर्ष नक्कीच माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं असं म्हणायला हरकत नाही. यात येत्या वर्षात येणाऱ्या माझ्या अल्बमची तयारी आणि मुंबई टाईम या प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाची प्रतीक्षा करतेय. त्या सिनेमासाठी मी संगीत दिग्दर्शिका म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यातील गाणी देखील प्रेक्षकांना नक्की आवडतील अशी आशा आहे.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय