02 March 2021

News Flash

“सावळ्या रंगामुळे मला ब्राऊनी म्हणायचे”; प्रियांकाने सांगितला वर्णद्वेषाचा अनुभव

प्रियांकाने वर्णद्वेषाचा सामना केला होता.

अमेरिकेत सध्या वर्णद्वेषविरोधी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे संपूर्ण अमेरिका पेटून उठली आहे. हॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांनी ब्लॅक लिव्ह्स मॅटर म्हणत या आंदोलनात भाग घेतला आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने देखील वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवला आहे. खरं तर प्रियांकाला देखील तिच्या रंगावरुन चिडवले जात होते. हा धक्कादायक अनुभव तिने एका मुलाखतीतून सांगितला आहे.

काय म्हणाली प्रियांका?

“लहान असताना माझे मित्र मंडळी मला रंगावरुन चिडवायचे. माझा रंग सावळा असल्यामुळे ते मला ब्राऊनी म्हणायचे. कुटुंबातील माझी सर्व भावंड गोरी आहेत. त्यांच्या तुलनेत माझा रंग गडद आहे. कारण माझे बाबा गोरे नव्हते. परिणामी माझी भावंडं लहान असताना मला रंगावरुन चिडवायचे. सुरुवातील मी खूप चिढायचे. विविध क्रिम्स लावून गोरं होण्याचा प्रयत्न करायचे. पण नंतर त्वचेच्या रंगामागील वैज्ञानिक कारण कळलं त्यानंतर माझी चिढचिढ कमी झाली.” असा अनुभव एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितला होता. वर्णद्वेषाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला भारतीय कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांकाचा ही मुलाखत सध्या चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 6:29 pm

Web Title: was called curry brownie in school says priyanka chopra mppg 94
Next Stories
1 ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री सुरभी हांडे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर
2 बिबट्याची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक; व्हिडीओ पाहून स्वरा भास्कर संतापली
3 “आजही असं वाटतंय की, इरफान माझ्यासोबतच आहे; माझ्याशी बोलतोय”
Just Now!
X