18 January 2021

News Flash

बेली डान्स, अरेबियन तडका आणि अल्पावधीत ‘ दिलबर’ सोशल मीडियावर हिट !

अरेबियन तडका असलेलं 'दिलबर' हे गाणं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. युट्यूबवरच्या टॉप ट्रेडिंग यादीत दिलबर हे गाणं अव्वल स्थानी आहे.

'दिलबर' हे गाणं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.

काही दिवसांपूर्वी जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरपासून ‘दिलबर’ या गाण्याची चर्चा होती. या चित्रपटात ‘दिलबर’ गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन पाहायाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. नुकतंच या गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन प्रदर्शित करण्यात आलं. अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचा बेली डान्स, त्यावर अरेबियन तडका असलेलं ‘दिलबर’ हे गाणं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.

युट्यूबवरच्या टॉप ट्रेडिंग यादीत दिलबर हे गाणं अव्वल स्थानी आहे. या गाण्याला २ कोटी ८८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ९० च्या दशकात आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातलं हे गाणं आहे. सुष्मिता सेन आणि संजय कपूर या दोघांवर चित्रित केलेलं हे गाणं त्यावेळीदेखील सर्वात हिट गाणं ठरलं होतं. या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनसाठी नोरा फतेहनं खूपच मेहनत घेतली. नोरा उत्तम बेली डान्सर आहे. मात्र या गाण्यातील आपला डान्स सर्वोत्तम व्हावा यासाठी दहा दिवस नोरा सराव करत होती. अखेर तिची मेहनत फळाला आली. विशेष म्हणजे अनेकांना हे रिक्रिएटेड व्हर्जन मुळ गाण्याइतकंच आवडलं आहे. अनेकांना हे गाणं ऐकलं की आपल्या अदांनी घायाळ करणारी सुष्मिता आठवते त्यामुळे हे गाणं तितक्याच प्रभावीपणे मांडण्याचं मोठं आव्हान माझ्यापुढे होतं असंही नोरा म्हणाली.

१५ ऑगस्टला ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटातील मोहरमच्या एका दृश्यामुळे तो वादात सापडला आहे. या दृश्यामुळे मुस्लिम समाज्याच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे जॉन विरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 11:03 am

Web Title: watch satyameva jayate song dilbar nora fatehi song
Next Stories
1 रायगडावर रितेशचा महाराजांच्या पुतळ्यासोबत सेल्फी, शिवप्रेमी संतापले
2 फ्लॅशबॅक : नायक नही ‘खलनायक’ हू मैं…
3 Dhadak song Pehli Baar: ‘झिंगाट’नंतर आता ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन
Just Now!
X