04 March 2021

News Flash

Video: ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा हा व्हिडिओ पाहिलात का?

टॉयलेट सिनेमाच्या सगळ्या टीमला भेटा

अक्षय कुमार

अक्षय कुमारने आपल्या आगामी सिनेमा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, ‘टॉयलेट सिनेमाच्या सगळ्या टीमला भेटा. चित्रीकरणादरम्यानचे काही मजेशीर क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे.’ या व्हिडिओत अक्की दिव्येंदु शर्मा आणि भूमी पेडणेकरसोबत निवांत गप्पा मारताना दिसत आहे. दिव्येंदुबद्दल बोलताना अक्षय मस्करीमध्ये म्हणाला की, ‘आम्हाला सिनेमासाठी एका स्थानिक कलाकाराची गरज होती. दिव्येंदु हा याच शहरातील आहे.’

नुकतेच हा सिनेमा लीक झाला त्याबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की, ‘पायरसीविरोधातील ही लढाई फार महत्त्वाची आहे. आमचा टॉयलेट एक प्रेम कथा हा सिनेमा लीक झाला आहे. त्याचा तपास सध्या गुन्हे शाखेद्वारे केला जात आहे. मी माझ्या मित्रांना, सह-कलाकारांना, चाहत्यांना आणि प्रेक्षकांनी पायरसी सिनेमा पाहू नये. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.’ नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोजाने ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ला माहिती देत हा सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला.

रेमोने सांगितले की, ‘मी एका व्यक्तीला भेटलो ज्याने मला त्याच्याकडे ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा संपूर्ण सिनेमा पेन ड्राइव्हमध्ये असल्याचे सांगितले. सुरुवातीला मला तो मस्करी करतोय असे वाटले. पण नंतर त्याने पेन ड्राइव्हमधील तो सिनेमा दाखवला तेव्हा मला त्याचे गांभीर्य कळले.’ रेमोने तो पेन ड्राइव्ह स्वतःकडे घेतला.

…म्हणून रिचा शिकतेय मराठीची बाराखडी

तो स्वतः एक दिग्दर्शक असल्यामुळे पायरसी ही किती गंभीर बाब आहे हे त्याला चांगलेच माहित होते. त्याने यासंदर्भात सांगण्यासाठी अक्षय कुमारला फोन केला. पण सध्या तो त्याचा आगामी सिनेमा ‘गोल्ड’च्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. रेमोने तो पेन ड्राइव्ह सिनेमाच्या टीमकडे सुपूर्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:15 pm

Web Title: watch toilet ek prem katha behind the scenes video akshay kumar bhumi pednekar seem to have a great time on sets
Next Stories
1 या अभिनेत्रीमुळेच अनुष्का शर्मा झाली अभिनेत्री
2 …म्हणून रिचा शिकतेय मराठीची बाराखडी
3 ‘विनोदाचा ‘मीटर’ पाळावाच लागतो’
Just Now!
X