02 March 2021

News Flash

Dhadak Movie : जान्हवीच्या बहिणीची ‘खुशी’ गगनात मावेना, ‘झिंगाट’वर धरला ठेका

'धडक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, आता या चित्रपटाविषयी अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

खुशी कपूर, जान्हवी कपूर, धडक, dhadak

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुलीने म्हणजेच जान्हवी कपूर हिने एक अभिनेत्री म्हणून या कलाविश्वात पदार्पण केलं आहे. तिचा ‘धडक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, आता या चित्रपटाविषयी अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जान्हवी कलाविश्वात पदार्पण करणार म्हटल्यावर सध्याच्या घडीला संपूर्ण कलाकार मंडळी आणि कपूर कुटुंबाची फौज तिच्या पाठीशी उभी राहिली आहे.

अर्जुन कपूरपासून ते अभिनेत्री रेखापर्यंत प्रत्येकानेच जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचं या कलाविश्वात स्वागत केलं आहे. जान्हवीची बहीण खुशी कपूरही यात मागे नाही. ‘धडक’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्याच वेळी खुशी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आपल्या बहिणीच्या आयुष्यात आलेल्या या वळणावर ती अत्यंत आनंदीत असून ‘धडक’मधील गाण्यावर तिने ठेकाही धरला आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक फॅनपेजवरुन खुशीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ती बेभानपणे ‘झिंगाट’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

‘धडक’ प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर खुशीचा हा अंदाज जान्हवीचंही मन जिंकेल यात वाद नाही. दरम्यान, शशांक खैतान या चित्रपटातून जान्हवीने तिच्या करिअरचा श्रीगणेशा केला आहे. सध्याच्या घडीला कलाकार आणि समीक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला असून, आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 12:16 pm

Web Title: watch video khushi kapoor does the zingaat step from sister janhvi kapoors movie dhadak
Next Stories
1 मुसळधार पाऊस आणि पूरावर मात करत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे महत्त्वपूर्ण चित्रीकरण
2 चाहत्यांच्या उदंड प्रतिसादात ‘फर्जंद’ने गाठली पन्नाशी
3 कॅन्सरविषयीच्या ‘त्या’ ट्विटचा लकी अलीने केला खुलासा
Just Now!
X