News Flash

‘मिर्झापूर २’ची उत्सुकता वाढली; नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

पाहा, उत्सुकता वाढविणारं 'मिर्झापूर २'चं नवीन पोस्टर

प्रचंड चर्चेत असलेल्या मिर्झापूर वेब सीरिजचा दुसरा सीजनही प्रदर्शित झाला. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिर्झापूर-२ बघण्यासाठी प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. सध्या सोशल माध्यमांसह सगळीकडं या वेब सीरिजची चर्चा होतेय. (छायाचित्र सौ.- instagram.com/yehhaimirzapur/)

अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज म्हणजे ‘मिर्झापूर’. लवकरच या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये एकच उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच या सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून नुकतंच ‘मिर्झापूर २’चं नवीन पोस्ट प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘मिर्झापूर २’चं प्रदर्शित झालेलं पोस्टर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरमध्ये एक जीप (गाडी) उभी असून त्याच्या बाजूला जमिनीवर कोसळलेल्या एका इसामाचा हात दाखवण्यात आला आहे. या इसमाच्या हातात एक बंदूकदेखील दिसून येत आहे. त्यामुळे हे पोस्टर सध्या चांगलंच चर्चेत येत आहे. तसंच ‘मिर्झापूर’च्या पहिल्या भागात दाखविण्यात आलेली गुंडगिरी, सत्तेचा वाद पुन्हा एकदा नव्या रुपात पाहता येणार आहे, असंही म्हटलं जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘मिर्झापूर २’चं पहिलंवहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यातच आता नवीन पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं दिसून येत आहे. मिर्झापूर या सीरिजचा पहिला भाग १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. सर्वसामान्य कुटुंबातील दोन मुले गुंडगिरीकडे कशी वळतात. कशा पद्धतीने गुन्हे जगतात एकएक पायरी चढून ते स्वत:चे स्थान निर्माण करतात. याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर मिर्झापूर २ ही नवीन सीरिज २३ ऑक्टोबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 12:23 pm

Web Title: web series new poster of mirzapur 2 released ssj 93
Next Stories
1 कोरिओग्राफर टेरेन्सने नोरा फतेहीसोबत केले गैरवर्तन?
2 अभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव
3 “ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग”; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया
Just Now!
X