08 March 2021

News Flash

“पावरी हो रही है” नक्की आहे तरी काय?

जाणून घ्या काय आहे नक्की प्रकरण..

सध्या सोशल मीडियावर ‘pawari ho rahi hai’ असे म्हणत एका मुलीने शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक मीम्स सुद्धा व्हायरल झाले आहेत. पण आता अनेकांना या व्हिडीओत असणारी ती मुलगी कोण आहे? हा व्हिडीओ कोणाचा आहे? असे अनेक प्रश्न पडले आहेत. चला जाणून घेऊया..

या व्हिडीओत असणारी मुलगी पाकिस्तानची आहे. ती एक कॉन्टेंट क्रिएटर असून तिचे नाव Dananeer आहे. Dananeer ने हा व्हिडीओ ६ फेब्रुवारी रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत ती ‘ये में हूं, ये हमारी कार है, और ये हमारी पावरी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ ४४ लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. Dananeer चा पार्टीला पावरी बोलण्याचा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. फक्त नेटकऱ्यांनी नाही तर नेटफ्लिक्स पासून डॉमिनॉज, पीआयबी फॅक्टचेक, झोमॅटोपर्यंत अनेकांनी हे मीम्स शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

नॉर्मल व्हिडीओंपेक्षा या व्हिडीओचे विनोदी एडिटेड व्हर्जन प्रचंड व्हायरल झाले आहे. हे विनोदी व्हर्जन दुसऱ्या कोणी नाही तर ‘रसोड़े में कौन था’, ‘बिगिनी शूट’ आणि ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता’ हे एडिट करणारा यशराज मुखाते आहे. त्याने हे एडिट केले आहे. त्याच्या या विनोदी एडीटमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:24 pm

Web Title: what is pawari ho rahi hai trend dcp 98 avb 95
Next Stories
1 अभिमानास्पद! मिस इंडिया रनरअप मान्या वडिलांच्या रिक्षातून पोहोचली इव्हेंटला, पाहा व्हिडीओ
2 बिग बींच्या नातीचा ‘प्रोजेक्ट नवेली’, बॉलिवूडकडे फिरवली पाठ
3 मुलगा की मुलगी? सैफच्या बहिणीची ‘ती’ पोस्ट पाहून चाहत्यांनी विचारला प्रश्न
Just Now!
X