सुश्मिता सेनची लव्ह लाइफ नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. २० तारखेला सुश्मिताने एक ट्विट केले. हे ट्विट पाहिल्यानंतर तिच्या आयुष्यात स्पेशल व्यक्तिची एण्ट्री झाली आहे. सुश्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक कोट शेअर केला आहे. या कोटमध्ये लिहिले आहे की, ‘मी माझ्या ‘सेकंड हाफ’ला शोधत नाहीये. कारण मी अर्धी नाहीये. मी पूर्णपणे तुझी आहे.’

सुश्मिताचा हा मेसेज वाचून ती नक्कीच कोणाला तरी डेट करत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. गेल्या वर्षी सुश्मिताने तिचा कथित प्रियकर रितिक भसीनसोबत ब्रेकअप केले आहे. पण ब्रेकअपनंतरही दोघं झहीर खान आणि सागरिका घाडगेच्या लग्नाला एकत्रच गेले होते.
दोघांना एकत्र पाहून असे म्हटले जात होते की त्यांचे ब्रेकअप झालेच नाही. या लग्नात अनेक मित्र- मैत्रिणी त्यांना लवकरात लवकर लग्न करण्याचा सल्ला देत होते. आता सुश्मिताचा हा मेसेज पाहून अखेर तिला तिचा राजकुमार भेटला असेच म्हणावे लागेल.

रितिकआधी सुश्मिताचे विक्रम भट्ट, रणदीप हुडा, वसीम अकरम आणि बंटी सचदेवा असे अनेक प्रियकर होते. अखेर या सगळ्यांना डेट करुन शेवटी तिला तिच्या मनासारखा प्रियकर भेटला यातच तिचे चाहते समाधानी असतील. त्यामुळे या वर्षभरात जर तिच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.