News Flash

..जेव्हा सुशांतने आलिया भट्टवर व्यक्त केली होती नाराजी

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आलिया भट्ट, सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. करण जोहर, आलिया भट्ट, सलमान खान यांसारख्या सेलिब्रिटींविरोधात नेटकरी राग व्यक्त करत आहेत. सुशांतचेही जुने पोस्ट, ट्विट पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागले आहेत. २०१५ मध्ये सुशांतने आलिया भट्टवर नाराजी व्यक्त करत एक ट्विट केलं होतं. त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

सुशांतच्या ‘राबता’ या चित्रपटासाठी आधी आलिया भट्टची निवड झाली होती असं म्हटलं जातं. मात्र ऐनवेळी तारखा जुळत नसल्याचं कारण देत तिने चित्रपटातून काढता पाय घेतला. तेव्हा तिच्या जागी क्रिती सनॉनला घेण्यात आलं. करण जोहरच्या ‘शुद्धी’ या चित्रपटासाठी आलियाने सुशांतचा ‘राबता’ सोडल्याचं म्हटलं जात आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतने त्यावेळी ट्विट करत म्हटलं होतं, ‘हे खूप मजेशीर आहे की लोक स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या प्रोजेक्टचं नुकसान करतात.’ सुशांतचं हे ट्विट आता डिलिट करण्यात आलं आहे.

आणखी वाचा : आत्महत्येच्या तीन दिवस आधी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देऊन सुशांत म्हणाला…

रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 2:53 pm

Web Title: when a miffed sushant singh rajput posted a cryptic tweet for alia bhatt for walking out of raabta ssv 92
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येवर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातून शोक व्यक्त; उपसंचालक म्हणाले…
2 ‘तू कितीही जेवलीस तरी… ‘; बायकोसाठी अमेय वाघची भन्नाट पोस्ट
3 ‘मला माफ कर’; सुशांतच्या आठवणीत बहिणीची भावूक पोस्ट
Just Now!
X