News Flash

…म्हणून ऐश्वर्या राय गरोदर असताना मधूर भांडारकर होता नैराश्यात

या कारणामुळे त्याने ऐश्वर्या रायला पहिली पसंती दिली होती

‘हम दिल दे चुके सनम’,’ताल’,’जोधा अकबर’, ‘देवदास’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा आज वाढदिवस. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर ऐश्वर्याचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट चाहत्यांमध्ये रंगत असते. यामध्येच ऐश्वर्या प्रेग्नंट असताना दिग्दर्शक मधूर भांडारकर हे नैराश्यात गेल्याची चर्चा रंगली आहे.

सुपरहिट चित्रपट करणाऱ्या मधूर भांडारकरचा ‘हिरोईन’ हा ड्रीम प्रोजेक्ट होता. या चित्रपटासाठी त्याने ऐश्वर्या रायला पहिली पसंती दिली होती. यासाठी त्याने तिच्यासोबत प्रोजेक्ट साईनदेखील केलं होतं. मात्र त्यावेळी ती गरोदर असल्याचं मधूरला माहित नव्हतं. ऐश्वर्या गरोदर असल्याची माहिती समजल्यानंतर मधूर प्रचंड चिंतेत आला होता. कारण हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता.

हा चित्रपट तयार करण्यासाठी मधूरने जवळपास दीड वर्ष रिसर्च केलं होतं. त्यामुळे त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा आणि मोठा प्रोजेक्ट होता. या चित्रपटासाठी त्याने ४० लोकेशन्स फिक्स केले होते. या चित्रपटासाठीचं सारं काही फिक्स करण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी मुख्य भूमिकेत झळकणारी ऐश्वर्या गरोदर असल्याचं समजताच मधूर प्रचंड नैराश्यात गेला आणि त्यामध्येच त्याने ऐश्वर्याला या चित्रपटातून काढून टाकलं.

वाचा : ‘माझ्या गाण्याचं रिमिक्स केलं तर याद राखा’

“या चित्रपटामध्ये असे काही सीन होते. जे गरोदर असताना ऐश्वर्याला करणं शक्य झालं नसतं. या चित्रपटातील ८ दिवसांचं चित्रीकरण झालं होतं. त्याचवेळी माझी सहाय्यक दिग्दर्शिका एका डान्सची प्रॅक्टीस करत असताना घसरुन पडली ही गोष्ट मी आजही विसरु शकत नाही.जर तिच्या जागी ऐश्वर्या असती आणि जर ती पडली असती तर मी आजपर्यंत कधीच स्वत:ला माफ करु शकलो नसतो. चित्रपटातील काही भागांमध्ये अभिनेत्रीला धुम्रपान करायचं होतं. मात्र गरोदर महिलांना धुम्रपान करण्यास मनाई आहे. या चित्रपटामध्ये अशा अनेक गोष्टी होत्या ज्या गरोदर महिला करु शकत नाही. त्यामुळे मी तिला चित्रपटातून काढून टाकलं”, असं मधूरने सांगितलं.

वाचा : “माझ्या पतीला फोन केला अन् म्हणाला..”; सोना मोहपात्राचे सोनू निगमवर गंभीर आरोप

पुढे तो म्हणतो, “ऐश्वर्या गरोदर असल्याची माहिती मला एका वृत्तवाहिनीमुळे मिळाली. त्यावेळी ती ४ महिन्यांची गरोदर होती. या कलाविश्वामध्ये सारं काही विश्वासावर चालतं. मात्र ऐश्वर्याने तोच विश्वास तोडला होता”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 12:25 pm

Web Title: when aishwarya rai pregnant madhur bhandarkar was depression ssj 93
Next Stories
1 ‘गणेश गायतोंडे’ लवकरच मराठीत
2 ”माझ्या पतीला फोन केला अन् म्हणाला..”; सोना मोहपात्राचे सोनू निगमवर गंभीर आरोप
3 प्रियांका चोप्रा म्हणते, “ही गोष्ट खाल्ल्याशिवाय माझं जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही”
Just Now!
X