News Flash

‘या’ ठिकाणी रणबीरने केले आलिया भट्टला प्रपोज

'ये जवानी है दीवानी' सिनेमातील क्षण रणबीरने खऱ्या आयुष्यात आणत आलियाला प्रपोज केले

रणबीर कपूर, आलिया भट्ट

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या अफेअरची चर्चा जुनी झाली असली तरी त्यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या वाचायला त्यांच्या चाहत्यांना आजही आवडते. आलिया आणि रणबीर सध्या दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. नुकतेच रणबीरने आलियाला प्रपोज कसे केले याबद्दल माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, रणबीरने आलियाला सहा महिन्यांपूर्वी प्रपोज केले होते.

alia, neetu

मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रणबीरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी आलियाला पहिल्यांदा डेटसाठी विचारले. तेव्हा दोघंही बल्गेरियामध्ये ‘ब्रम्हास्त्र’चे चित्रीकरण करत होते. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रणबीर आणि आलियाच्या जवळच्या मित्रांनाच त्यांच्या नात्याबद्दल माहित होते. जेव्हा रणबीर मुंबईत आला तेव्हा त्याने सिनेसृष्टीतील काही लोकांना त्यांच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले.

alia ranbir

‘ये जवानी है दीवानी’ सिनेमात रणबीर दीपिकालाही नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रपोज करतो. सिनेमातील हा क्षण रणबीरने खऱ्या आयुष्यात आणत आलियाला प्रपोज केले होते. आलियाच्या नावाला कपूर कुटुंबाकडून हिरवा कंदीलही मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी रणबीरची आई नीतू कपूर बल्गेरियाला गेल्या होत्या.

alia ranbir

तसेच रणबीरची बहिण रिदिमाने आलियाला एक ब्रेसलेट भेट म्हणून दिले होते. काही दिवसांपूर्वी रणबीरने आलिया आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना जीक्यू मासिकाला सांगितले होते की, आम्ही दोघं एकमेकांना डेट करत आहोत हे खरं आहे. पण या सगळ्या गोष्टी दोघांसाठी नवीन असल्यामुळे याबद्दल आत्ताच काही बोलणं चुकीचं असेल.

ranbir, alia

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:43 pm

Web Title: when and where ranbir kapoor propose to alia bhatt
Next Stories
1 ‘या’ चित्रपटातून महेश बाबू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
2 चाललंय तरी काय? निकच्या कौटुंबिक कार्यक्रमात प्रियांकाची उपस्थिती
3 Video : ..जेव्हा जान्हवी शाहरुखला पुरस्कार प्रदान करते
Just Now!
X