News Flash

दीपिकाआधी हेमा मालिनी यांनी साकारलेली ‘पद्मावती’

त्यावेळी कोणत्याच वादाला तोंड फुटले नव्हते.

दीपिका पदुकोण, हेमा मालिनी

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचे असंख्य चाहते सध्या ‘पद्मावती’ या चित्रपटाकडेच डोळे लावून बसले आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकारत असून, अभिनेता रणवीर सिंग यात अलाउद्दीन खिल्जी आणि शाहिद कपूर महारावल रतन सिंग यांच्या भूमिेकेत झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील कलाकारांचे फर्स्ट लूक लाँच करण्यात आले. तेव्हापासूनच चित्रपट कधी एकदा आपल्या भेटीला येतो, याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. पण, या उत्साही वातावरणात मिठाचा खडा पडला आणि ‘पद्मावती’ प्रदर्शित होण्याची तारीख लांबणीवर गेली.

विविध राजपूत संघटनांनी भन्साळींच्या या भव्य चित्रपटाचा विरोध करत त्यात सहभागी कलाकारांना धमकावलेसुद्धा. राणी पद्मावती आणि राजपूत संस्कृती मलीन करत हा चित्रपट साकारण्यात आला असल्याचा आरोप अनेकांनी लावला. पण, दीपिकाच्या आधीही एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ही भूमिका साकारली होती. मुख्य म्हणजे त्यावेळी कोणत्याही वादाची ठिणगी न पडता अगदी सहजगत्या प्रेक्षकांना राणी पद्मावती पाहता आली होती. ती भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी.

हेमा मालिनी यांनी काही ऐतिहासिक भूमिका साकारल्या असून, राणी पद्मावतीची भूमिका त्यापैकीच एक आहे. १९८६ मध्ये दूरदर्शनवर ‘तेरह पन्ने’ या कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका साकारली होती. ‘तेरह पन्ने’ या मालिकेत १३ ऐतिहासिक घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. ज्यापैकी एका ऐतिहासिक कथेमध्ये राणी पद्मावती साकारण्याची संधी हेमा यांना मिळाली होती. त्यावेळी कोणत्याच प्रकारचा वाद किंवा टीका करण्यात आल्या नव्हत्या ही बाब सर्वात महत्त्वाची.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

एका कार्यक्रमात हेमा मालिनी यांना ‘पद्मावती’च्या मुद्द्यावरुन लोक जास्तच संवेदनशीलपणे व्यक्त होतात, याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर देतच आपण, ‘तेरह पन्ने’मध्ये राणी पद्मावती साकारल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 12:16 pm

Web Title: when bollywood actress hema malini played padmavati onscreen and her act was released as well deepika padukone movie
Next Stories
1 ‘एस दुर्गा’नंतर आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात
2 सारिका यांना त्यांचे घर परत मिळवून देण्यासाठी आमिरचा पुढाकार?
3 रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव कळलं का?
Just Now!
X