तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे आर. माधवन. तो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आर माधवन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तसेच तो सोशल मीडियाच्या माध्यामातून सतत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतो. नुकताच एका यूजरने आर. माधवनला लग्नासाठी विचारले आहे. त्यावर त्याने उत्तर देत त्या यूजरला प्रश्न विचारला आहे.

‘हाय आर. माधवन, मी तुझे जुने गाणे पुन्हा पाहत होते. कृपया मला तुझ्याशी लग्न करण्याची परवानगी दे’ असे एका यूजरने ट्विट करत म्हटले आहे. हे ट्विट त्या यूजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘नाला दमयंथी’ या तामिळ चित्रपटातील गाण्याचा आहे. आर. माधवन गाण्यामध्ये अनोख्या स्टाइलमध्ये नाचताना दिसत आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
Kangana Ranaut calls herself and Shah Rukh Khan last generation of stars
सिनेमे फ्लॉप होत असल्याने राजकारणात प्रवेश? थेट प्रश्न विचारल्यावर कंगनाने शाहरुखशी केली स्वतःची तुलना, म्हणाली…

त्या यूजरने शेअर केलेला व्हिडीओ पाहून आर. माधवनने देखील उत्तर दिले आहे. त्याने ‘तुला तामिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात वाईट डान्सरशी लग्न करायचे आहे का?’ असा प्रश्न त्या यूजरला विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांमध्ये झालेल्या संवादाची चर्चा सुरु आहे.

त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या या ट्विटवर अनेक कमेंट केल्या आहेत. ‘प्रत्येक हिरोकडे नृत्याचे कौशल्य असलेच पाहिजे असे नसते. आमच्यासाठी तुझ्या चेहऱ्यावरील हास्यच खूप आहे’ असे एका यूजरने कमेंट करत म्हटले आहे.

‘नाला दमयंथी’ हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आर. माधवनने ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका तामिळ कूकची भूमिका साकारली आहे. तसेच माधवनसोबत या चित्रपटात गीतू मोहनदास आणि श्रृती मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मीती कमल हासन यांनी केली आहे.