News Flash

‘या’ व्यक्तीच्या येण्यामुळे शिल्पाचा वाढदिवस झाला खास

शिल्पाने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असून तिने नुकतंच ४३ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवनवीन कलाकारांची एण्ट्री होत असते. यापैकी काही कलाकार आपल अस्तित्व सिद्ध करतात. तर काहींच्या वाट्याला अपयश येतं. मात्र जे अभिनेते किंवा अभिनेत्री प्रसिद्धीझोतात येतात त्यांच्या वाट्याला ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असे सगळे येतं. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि यशाचं शिखर गाठलं. शिल्पाने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असून तिने नुकतंच ४३ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

८ जून १९७५ रोजी मंगळूरू येथे जन्म झालेल्या शिल्पाने गुरुवारी तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. शिल्पाने तिच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले असून यावेळी शिल्पाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एका खास व्यक्तीने उपस्थिती दर्शविल्याचे शिल्पाने सांगितले आहे.

शिल्पाचा वाढदिवस खास होण्यासाठी राज कुंद्राने एक खास पद्धतीचा केक मागविला होता. हा केक पाहताच आश्चर्यचकित झालेल्या शिल्पाला काही वेळातच दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने येऊन शिल्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे शिल्पाने जॅकलीनला वाढदिवसाचे निमंत्रण दिलेले नसतानाही ती अचानक आल्यामुळे शिल्पाला धक्का बसला. मात्र हा अचानक मिळालेला धक्का गोड होता असं शिल्पाने सांगितलं.

दरम्यान, राजने मागविलेल्या केकवर शिल्पासारखी हुबेहूब दिसणारी बाहुली ठेवण्यात आली होती. ही बाहुली एका शिडीवर चढलेली दिसून येत आहे. सुपर डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये एखाद्या स्पर्धकाचे कौतूक करण्यासाठी शिल्पा ज्याप्रमाणे शिडीवर चढते ते पाहून या बाहुलीची रचना करण्यात आल्याचे शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 3:36 pm

Web Title: when jacqueline gatecrashes shilpa shetty birthday party
Next Stories
1 स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’
2 नितीन गडकरींनी घेतली नाना पाटेकरांची भेट
3 कमल हसन यांच्या ‘विश्वरूपम २’चं आमिर खान कनेक्शन माहितीये का?
Just Now!
X