‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या रोमकॉम चित्रपटांतून अभिनेता कार्तिक आर्यनने त्याची स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. लव्ह रंजन दिग्दर्शित ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिकच्या स्टारडममध्ये प्रचंड वाढ झाली. सैफ अली खानची मुलगी सारानेही त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या कार्तिकचा मात्र एका अभिनेत्रीमुळे हृदयभंग झाला आहे. ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण.

दीपिका पदुकोणने ‘निकलोडियन किड्स चॉईस अवॉर्ड्स’मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कार्तिक होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखेर कार्तिकने त्याच्या मनातील गोष्ट दीपिकासमोर बोलून दाखवली. ‘तुम मेरी होती, अगर तुम रणवीर भैय्या की नहीं होती,’ असं म्हणत दीपिकाला भाभी म्हणून हाक मारावी लागणार असल्याची खंत कार्तिकने व्यक्त केली. यावर दीपिकालाही हसू अनावर झालं.

वाचा : ‘कूली नं १’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरुण-आलिया?

गेल्या वर्षी इटलीत दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर बेंगळुरु आणि मुंबईत त्यांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. लग्नानंतर दीपिका आणि रणवीर दोघंही पुन्हा आपापल्या कामकाजात व्यग्र झाले आहेत. एकीकडे रणवीरचा ‘सिम्बा’ प्रदर्शित झाला असून दीपिका तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या तयारीला लागली आहे.