करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात साऱ्याच क्षेत्रातील कामकाज ठप्प असल्यामुळे फिल्मसिटीदेखील बंद असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत. या अभिनेत्री कतरिना कैफ अनेक वेळा इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यात सध्या कतरिनाचा एक स्विमिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कतरिनाने तिचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये ती खोल समुद्रात पोहत असून तिच्या बाजूला एक व्हेल मासाही दिसून येत आहे. विशेष म्हणजे कतरिनाचा हा व्हिडीओ अनेकांची मनं जिंकत असून अनेकांनी तिच्या हिंमतीला दाद दिली आहे.
आतापर्यंत हा व्हिडीओ २९ लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला असून त्यावर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. सध्या या लॉकडाउनच्या काळात कतरिना घरी राहून अनेक गोष्टी शिकत आहे.