News Flash

जेव्हा मोलकरणीला मारझोड केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आली होती अभिनेत्री किम शर्मा

किम शर्मावर तिच्या मोलकरणीने शिवीगाळ करणं आणि मारझोड करून पगार न दिल्याचा आरोप केला होता.

(Photo-instagram)

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. टेनिसपटू लिएंडर पेस आणि किम शर्माच्या अफेरच्या चर्चांना उधाण आलंय. त्या दोघांचे एकत्र फिरतानाचे गोव्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी किम अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत होती. दरम्यान तुम्हाला कदिचीत कल्पना नसेल मात्र २०१८ सालात किम शर्मावर तिच्या मोलकरणीने शिवीगाळ करणं आणि मारझोड करून पगार न दिल्याचा आरोप केला होता. यानंतर किमवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

२०१८ सालातील हे प्रकरण असून किम शर्मा चर्चेत आल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलंय. कपडे व्यवस्थित न धुतल्याने किमने मारहाण केल्याचा आरोप मोलकरणीने केला होता. किमच्या खार इथल्या बंगल्यात ही मोलकरीण काम करत होती.

हे देखील वाचा: ‘या’ कारणामुळे करिश्मा कपूरने ‘दिल तो पागल है’ सिनेमासाठी दिला होता नकार

मोलकरणीने दाखल केलेल्या तक्रारीत ती म्हणाली होती की “कपडे धुताना चुकून काळ्या ब्लाऊजचा रंग पांढऱ्या कपड्यांना लागला होता. माझी चूक लक्षात येताच मी खरं काय ते सांगितलं आणि त्यानंतर तिची वागणूक आश्चर्यचकित करणारी होती. मोठमोठ्याने ओरडत तिने मला घराबाहेर ढकललं. पुन्हा इथं येऊ नकोस असं म्हणत शिवीगाळसुद्धा केली,’ असे आरोप मोलकरणीने केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kimi Sharma (@kimsharmaofficial)

हे देखील वाचा: करीना कपूरचा दुसरा मुलगा ‘जेह’चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल; चाहते म्हणाले…
या घटनेनंतर मोलकरीण पुढच्या महिन्यात तिच्याकडे पगार घेण्यासाठी गेली होती मात्र किमने पगार देण्यास नकार दिला. पुन्हा पुन्हा मागूनही पगार देत नसल्याने अखेर मोलकरणीने २७ जून २०१८ रोजी खार पोलीस ठाण्यात किम विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी ३२३ आणि ५०४ या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान मोलकरणीच्या तक्रारीनंतर किमने स्पष्टीकरण देखील दिलं होतं.”प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला मोलकरणीला पगार दिला जातो. या घटनेनंतरही मोलकरणीला पगार देण्यात आला आहे. माझा ७० हजार रुपयांचा ड्रेस खराब केल्यानंतर तिला कोणतीही मारहाण न करता नोकरीवरुन जाण्यास सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण किमने दिलं होतं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 5:44 pm

Web Title: when kim sharama made file complaint against actress for accuses of assault kpw 89
Next Stories
1 मुंबईकरांना बाल्कनीत रोमान्स करण्यापासून कोण रोखतंय?, सुमीत राघवनने दिलं मजेशीर उत्तर
2 बिग बी आणि कादर खान यांच्या मैत्रीत ‘या’ कारणामुळे पडली होती फूट?
3 राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या रोमॅण्टिक डान्सचा व्हिडीओ व्हायरल; शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकले लव्ह बर्ड्स
Just Now!
X