05 March 2021

News Flash

सलमान लग्न कधी करणार? कतरिनाने दिले उत्तर, व्हिडीओ व्हायरल

सध्या त्यांचा हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे

बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ सलमान खान लग्न कधी करणार हा जणू काही राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारले जाते. त्याचे नाव देखील अनेक अभिनेत्रींशी जोडले आले. या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये कतरिना सलमानचे लग्न कोणत्या वर्षी होणार याचे उत्तर देत असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आणि कतरिना ‘कपिल शर्मा शो’मध्ये कपिलसोबत मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान कपिल कतरिनाला सलमानचे लग्न कोणत्या वर्षात होणार असा प्रश्न विचारतो. त्यावर कतरिनाने दिलेले उत्तर ऐकून सर्वांना हसू येते. ‘या प्रश्नाचे उत्तर केवळ दोन लोकांकडे आहे. एक म्हणजे भगवान आणि दुसरे म्हणजे सलमान’ तिचे हे उत्तर ऐकून सर्वांना हसू आले आहे.

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ जुना असला तरी मजेशीर आहे. सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 4:52 pm

Web Title: when salman khan get married answer given by katrina kaif video viral avb 95
Next Stories
1 पाच पैसे देऊन आयएएस ऑफिसर पाहायचे महाभारत, महाभारतातील कृष्णाने सांगितल्या जुन्या आठवणी
2 …तर आपल्याला थाळ्याच वाजवत बसावं लागेल; अनुराग व्यक्त केली भीती
3 ‘या’ कारणासाठी अमृताने केला होता नवऱ्याचा नंबर ब्लॉक
Just Now!
X