27 November 2020

News Flash

स्मिता पाटील यांना पडलेलं स्वप्न आणि ‘बिग बीं’चा अपघात..

‘कुली’च्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर अनेक चाहत्यांनी बिग बींच्या प्रकृतीसाठी नवस केला होता.

अमिताभ बच्चन, स्मिता पाटील

बॉलिवूडमध्ये गाजलेला ‘कुली’ हा चित्रपट साऱ्यांनाच आठवत असेल ना? या चित्रपटासोबतच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती. ‘कुली’च्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर अनेक चाहत्यांनी बिग बींच्या प्रकृतीसाठी नवस केला होता. पण हा अपघात घडण्याच्या एक दिवसापूर्वी अभिनेत्री स्मिता पाटील यांना त्याची कुणकुण लागली होती. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात खुद्द बिग बींनी ही आठवण सांगितली होती.

ते म्हणाले, ”‘कुली’च्या चित्रीकरणासाठी मी एकदा बंगळुरुला गेलो होतो. एके दिवशी मध्यरात्री २च्या सुमारास हॉटेलमधील फोन खणाणला. मला रिसेप्शनिस्टने सांगितले की, तुमच्यासाठी स्मिता पाटील यांचा फोन आला आहे. त्यावेळी मला धक्काच बसला कारण इतक्या रात्री काय झालं असावं या विचाराने मी घाबरलो होतो. पण, महत्त्वाचे काहीतरी काम असेल म्हणून मी तिच्याशी बोललो. स्मिताने मला विचारले की, तुमची प्रकृती कशी आहे, तुम्हाला काही झाले तर नाही ना? तर मी म्हणालो, हो माझी प्रकृती व्यवस्थित आहे. मग ती म्हणाली, मला तुमच्याबद्दल एक वाईट स्वप्न पडलं म्हणून मी इतक्या उशिरा तुम्हाला फोन केला. त्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी ‘कुली’च्या सेटवर माझा अपघात झाला. नंतर स्मिता मला रुग्णालयात फुलांचा गुच्छ घेऊन भेटण्यास आली होती.”

आणखी वाचा- प्रेमासाठी त्यांनी ओलांडला ‘उंबरठा’; स्मिता पाटील यांची लव्हस्टोरी

इतक्या वर्षांनीही हा अपघात बिग बींसोबतच त्यांच्या चाहत्यांनाही कायम लक्षात राहणारा आहे. कारण त्यातून बिग बींचा जणू पुनर्जन्मच झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 10:34 am

Web Title: when smita patil called amitabh bachchan in the middle of the night to check if he was ok ssv 92
Next Stories
1 Video : …म्हणून करोनावर मात करणाऱ्या तमन्ना भाटियाची होतीये चर्चा
2 बडोद्याच्या दांडियाची आठवण
3 ‘सुपर वुमन’! ड्रीमगर्लला मुलीने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
Just Now!
X