वीरप्पन म्हटलं की सगळ्यांसमोर येतो तो लांब मिशी असणारा हडकुळा माणूस. वीरप्पनचं पूर्ण नाव होतं मुनिस्वामी वीरप्पन. या कुख्यात गुंडाने ३० वर्षे कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ भागात त्याचे राज्य होते. त्याच्या हाताखाली सुमारे १०० डाकूही होते. वीरप्पनने सुमारे १२० लोकांचे आणि २००० हत्तींच्या कत्तली केल्या होत्या. शेवटी पोलिसांनी ऑपरेशन कुकूनमध्ये वीरप्पनला मारले. पण फार कमी लोकांना माहित आहे की वीरप्पन हा सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा चाहता होता. या कारणामुळेच पोलिसांनी वीरप्पनला पकडण्यासाठी रजनीकांत यांची मदत मागितली होती.

वीरप्पनच्या नावावर आतापर्यंत अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली. आपल्यावरही कधी सिनेमा होईल याची कदाचित त्याला कल्पना नसेल. स्वतः वीरप्पनला बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे पाहायला आवडायचे. त्याला पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सने सर्व प्रयत्न सुरू केले होते. याचाच एक पर्याय म्हणून स्पेशल फोर्सने रजनीकांत यांची भेट घेतली.

एसटीएफच्या टीमने रजनीकांत यांच्याकडे वीरप्पनला शरणागती पत्करावी असे सांगितले. रजनीकांत यांचा तो मोठा चाहता असल्यामुळे तो त्यांचे म्हणणे टाळणार नाही असे पोलिसांना वाटले होते. पण रजनीकांत यांनी त्यांच म्हणणे मान्य केले नाही. असे म्हटले जाते की, रजनीकांत यांच्या मते, जर वीरप्पनने त्यांचे म्हणणे मान्य केले नाही तर त्यांची प्रेक्षकांसमोरची प्रतिमा मलीन होईल.