News Flash

“बॉलिवूड घराणेशाहीमुळे ग्रासलं आहे”; सुशांतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

"घराणेशाहीमुळे एक दिवस बॉलिवूड उद्योग मोडकळीस येईल"

सुशांत सिंह राजपूत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असे काही कलाकारांचे मत आहे. दरम्यान सुशांतचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो घराणेशाहीवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. या घराणेशाहीमुळे एक दिवस संपूर्ण बॉलिवूड उद्योगच कोसळून पडेल, अशी भविष्यवाणी त्याने केली होती.

काही वर्षांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुशांतने ही मुलाखत दिली होती. “बॉलिवूडमध्ये घराणेशाही नक्कीच आहे. परंतु त्याबाबत तुम्ही काहीही करु शकत नाही. घराणेशाही असणं ही समस्या नाही तर नव्या कलाकारांना संधी दिली जात नाही ही समस्या आहे. परंतु हे कधीना कधी तुम्हाला थांबवावंच लागेल. अन्यथा एक दिवस संपूर्ण उद्योगच कोलमडून जाईल.” अशा आशयाची प्रतिक्रिया सुशांतने दिली होती. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 5:22 pm

Web Title: when sushant singh rajput spoke about nepotism in bollywood mppg 94
Next Stories
1 करोनाची चाचणी करण्यासाठी अभिनेत्रीनं सलमानकडे मागितले पैसै
2 Lockdown : ‘आईच्या त्या प्रश्नांची किंमत कळते’; ‘या’ अभिनेत्याने शेअर केला बालपणीचा फोटो
3 “सुशांतच्या मृत्यूमागे मोठा कट”; न्यायालयीन चौकशी करण्याची भाजपा खासदाराची मागणी
Just Now!
X