News Flash

“उर्मिला मला प्रॉस्टिट्युट म्हणाली तेव्हा फेमिनिझम कुठे गेला होता?” कंगनाचा सवाल

वाचा.. काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना रणौत व उर्मिला मातोंडकर यांच्यातील शाब्दिक चकमक टिपेला पोहोचली आहे. कंगनाने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्यावर टिकास्त्र सोडलं. त्यावर प्रत्युत्तर देताना “उर्मिला मला प्रॉस्टिट्युट म्हणाली तेव्हा फेमिनिझम कुठे गेला होता”, असा सवाल कंगनाने केला.

काय आहे प्रकरण?

कंगनाच्या मुंबईतील घरातील अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेकडून पाडण्यात आलं. बांधकाम पाडल्यानंतर घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत कंगनाने “माझा बलात्कार झाल्यासारखं वाटलं”, असं लिहिलं. तिच्या या वाक्यावर एका ट्विटर युजरने आक्षेप घेतला. ‘दुसऱ्या कलाकाराला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणतेस. नैतिकदृष्ट्या तुझी पातळी खालावली आहे. बलात्काराचा अनुभव कसा असतो हे तुला ठाऊक आहे का? घराचं बांधकाम पाडल्याची तुलना तू बलात्काराशी कशी करू शकतेस’, असा प्रश्न या ट्विटर युजरने विचारला.

त्या ट्विटर युजरला उत्तर देताना कंगना म्हणाली, “उर्मिला मला प्रॉस्टिट्युट म्हणाली तेव्हा फेमिनिझम कुठे गेला होता? हा सर्व खोटा स्त्रीवाद आहे. माणसांना केवळ शारीरिक नाही तर भावनिक आणि मानसिक शरीरसुद्धा असतं हे तुला माहित आहे का? बलात्कार म्हणजे केवळ शारीरिक संबंध नाही.”

आणखी वाचा : उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्न स्टार- कंगना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 3:58 pm

Web Title: where was your feminism when urmila called me rudali and a prostitute asks kangana ranaut ssv 92
Next Stories
1 “अस्वच्छ थाळी स्वच्छ करतोय”; जया बच्चन यांच्यावर भोजपुरी अभिनेत्रीची टीका
2 ‘इज्जत कमावण्यासाठी…’, सोनू सूदच्या ट्विटवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया
3 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्याचे निधन
Just Now!
X