26 February 2021

News Flash

KBC 12 : यंदाच्या पर्वात पहिल्या करोडपती होणाऱ्या कोण आहेत नाजिया नसीम ?

जाणून घ्या, नाजिया नसीम यांच्याविषयी

कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोमध्ये दिल्लीच्या नाजिया नसीम यंदाच्या सिझनमधील पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यामुळे नाजिया यांना हा खेळ सोडावा लागला. तेव्हापासून सोशल मीडियावर नाजिया नसीम यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. म्हणूनच नाजिया नसीम कोण आहेत हे जाणून घेऊयात.

नाजिया नसीम या मूळच्या झारखंडमधील रांची जिल्ह्यातील डोरंडा पारसटोली येथील असून सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहे. नाजियाच्या वडिलांचं नाव मोहम्मद नसीमुद्दीन असून ते स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया येथून सेवानिवृत्त झाले आहेत. नाजिया यांनी दोन बहिणी आहे. नाजिया यांचं शालेय शिक्षण रांचीमध्ये झालं त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी दिल्ली गाठली. दिल्लीत त्यांनी मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं. सध्या त्या दिल्लीत स्थायिक आहेत.

आणखी वाचा- KBC मध्ये सात कोटींसाठी विचारला सुभाषचंद्र बोसांवरील ‘हा’ प्रश्न, स्पर्धकाला नाही आलं उत्तर

नाजिया यांचं लग्न झालं असून त्यांना १० वर्षांचा मुलगा आहे. नाजिया यांचे पती छत्तीसगडमधील भिलाई येथील मूळ रहिवासी असून त्यांची एक जाहिरात कंपनी आहे. तर, नाजिया या स्वत: एक ग्रुप मॅनेजर असून गुरुग्राम येथे त्यांचं कार्यालय आहे. दरम्यान, नाजिया यांना हिंदी आणि उर्दू शायरी करण्याची विशेष आवड आहे. केबीसीच्या सेटवरदेखील त्यांनी काही शायरी सादर केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 9:54 am

Web Title: who is kbc 12 first crorepati contestant nazia nasim full profile with family details ssj 93
Next Stories
1 KBC मध्ये सात कोटींसाठी विचारला सुभाषचंद्र बोसांवरील ‘हा’ प्रश्न, स्पर्धकाला नाही आलं उत्तर
2 …म्हणून कुटुंबाला घेऊन जुहू बीचवरुन पळाले होते अमजद खान
3 अमली पदार्थविरोधी पथकाकडून मॉडेल गॅब्रीएलाची चौकशी
Just Now!
X