News Flash

… म्हणून मालिकांना पडले ‘डेली सोप’ असे नाव

दररोज टीव्हीवर दिसणाऱ्या या सिरियल्सना आपण 'डेली सोप' का बरे म्हणू लागलो.

दररोज टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांना आपण ‘डेली सोप’ म्हणतो. हा शब्दप्रयोग आपल्या इतक्या अंगवळणी पडला आहे, की टीव्ही मालिकांना समानार्थी शब्द म्हणजे ‘डेली सोप’ असाच आपला समज झाला आहे. परिणामी या शब्दाचा उच्चार करताना आता आपल्याला काहीच नवल वाटत नाही. परंतु हा शब्द आला कुठुन आणि कसा?

दररोज टीव्हीवर दिसणाऱ्या या सिरियल्सना आपण ‘डेली सोप’ का बरे म्हणू लागलो.?

तर त्याची सुरूवात झाली १९२० मध्ये. १९२० साली अमेरिकेत रेडिओ क्रांती झाली. त्यामुळे रेडिओ वाहिन्यांमध्ये स्वत:ची पत वाढवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेचा मोठ्या वाहिन्यांवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र बऱ्याचशा लहान वाहिन्यांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. त्यांना जाहिराती मिळवण्यासाठी उत्पादन कंपन्यांच्या अक्षरश: हातापाया पडावे लागत होते. या कंपन्यादेखील आपल्या उत्पादनात श्रोत्यांना किती रस आहे, याचे सर्वेक्षण करुनच रेडिओ वाहिन्यांचे शो स्पॉन्सर (प्रायोजित) करत असत.

दरम्यान १९३३ साली प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीकडे प्रतिस्पर्धी लिव्हर ब्रदर्स या कंपनीला व्यवसायात मागे टाकण्याची एक सुवर्ण संधी चालून आली. त्यावेळी त्यांनी एन. बी. सी. रेडिओ नेटवर्क या वाहिनीवर ‘मा पर्किन्स’ नावाच्या एका शोला मोठी स्पॉन्सरशीप दिली. या आर्थिक मदतीच्या बदल्यात त्यांनी ऑक्सिडॉल नामक साबणाची जाहिरात केली. मा पर्किन्स ही रेडिओ मालिका लाकूड तोडणाऱ्या महिलेवर आधारित होती.

या मालिकेच्या निर्मात्यांनी ऑक्सिडॉल साबणाच्या जाहिरातीत डेली सोप हा शब्द पहिल्यांदा वापरला. जसजशी ही मालिका लोकप्रिय झाली, तसतसा डेली सोप हा शब्द देखील लोकांच्या अंगवळणी पडू लागला. पुढे हीच कल्पना एन. बी. सी. रेडिओ नेटवर्कच्या इतर स्पर्धक वाहिन्यांनी वापरण्यास सुरुवात केली. त्यांनी जाहिरात मिळालेल्या प्रत्येक मालिका चक्क डेली सोप या नावानेच ब्रॉडकास्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर हीच प्रक्रिया टीव्ही मालिकांच्या बाबतीतही सुरु राहिली. आणि पाहता पाहता दररोज प्रदर्शित होणाऱ्या टीव्ही मालिकेला डेली सोप असे म्हणण्याची प्रथा रुढ झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 10:24 am

Web Title: why are tv serials called daily soaps mppg 94
Next Stories
1 वाढदिवशी अक्षय कुमारकडून चाहत्यांना विशेष भेट, केली ‘ही’ घोषणा
2 ‘या’ अभिनेत्रीमुळे अक्षय कुमारला मिळाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री
3 वादग्रस्त ‘गुमनामी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूशी आहे निगडीत
Just Now!
X