13 December 2018

News Flash

…म्हणून अजय हनिमून अर्ध्यातच सोडून परतला होता

अजयने स्वत:च सांगितला हा किस्सा

काजोल, अजय देवगण

विरोधी स्वभावाचे लोक एकमेकांकडे अधिक आकर्षित होतात असे म्हणतात. काजोल- अजयकडे बघून ही गोष्ट किती खरी आहे हे लगेच कळते. काजोल ही तिच्या मजा मस्तीसाठी आणि सततच्या बडबडीसाठी प्रसिद्ध आहे तर अजय तेवढाच शांत आणि कणखर आहे. या ‘ऑफबीट कपल’ने नुकत्याच एका शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अजयने त्याच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा प्रेक्षकांना सांगितला.

हा किस्सा होता अजय आणि काजोलच्या हनिमूनचा. लग्नानंतर दोन महिन्यांची सुट्टी घेऊन एकमेकांना वेळ देण्याचा निर्णय या दोघांनी घेतला होता. एक महिन्याचा वर्ल्ड टूरदेखील त्यांनी प्लान केला होता. ‘पण मी माझा हनिमून अर्ध्यातच सोडून पळून आलो होतो. मला हनिमूनसाठीच्या सुट्ट्या जरा जास्तच वाटत होत्या,’ असे त्याने सांगितले. तर अजयला घराची आठवण येत असल्याने आम्ही अर्ध्यातूनच परतलो होतो, असे काजोलने म्हटले.

वाचा : भाऊ कदमने सुरू केलं स्ट्रगलर्सचं कॅन्टीन

पुढे अजयने म्हटले की, ‘बदलत्या वातावरणात मी स्वत:ला बदलू शकत नाही.’ यावेळी अजयने त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयीदेखील माहिती दिली. एका कथेवर तो सध्या काम करत असून त्या चित्रपटाचे दिग्दर्शन तो स्वत: करणार असल्याचे त्याने सांगितले. त्याचा आगामी ‘रेड’ हा चित्रपट १६ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने या शोमध्ये हजेरी लावली होती.

First Published on March 13, 2018 5:09 pm

Web Title: why did ajay devgn and kajol leave their honeymoon midway