बॉलिवूडचा भाईजान, अभिनेता सलमान खानने अनेक नव्या कलाकारांना लाँच केले आहे. या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे झरीन खान. नुकताच झरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने जिवंत माणसाची कधीही प्रशंसा होत नाही असे म्हटले आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

झरीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमुळे ती सध्या चर्चेत आहे. ‘सध्या माझ्या डोक्यात अनेक ‘का’ (प्रश्न) आहेत. एखाद्या व्यक्तीला त्याची किंमत सांगण्यासाठी मरावे का लागते? एखाद्या व्यक्तीचे जिवंत असताना जितके कौतुक केले जात नाही तितके त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती नसतानाही त्याच्या विषयी अनेक मतं तयार केली जातात आणि बोलले जाते असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोशल मीडिया तुम्ही सुखात आहात की दु:खात हे का ठरवते असे तिने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. सध्या झरीनची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

झरीने सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातून तिने बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने तामिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.