‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित बहुचर्चित ‘सुई धागा’ हा चित्रपट अखेर आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असून प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासात तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल असं एकंदरीत दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊ यात हा चित्रपट पाहण्यामागील कारणं.

१. वरुण- अनुष्काची केमिस्ट्री – या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वरुण आणि अनुष्काने स्क्रिन शेअर केली आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं दिसून येत आहे. तसंच या दोघांनीही त्यांच्या भूमिकेला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

२. वरुणचा अभिनय आणि ट्रॅक रेकॉर्ड – स्टुडंट ऑफ दि इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुणचा आतापर्यंत प्रत्येक चित्रपट सुपहिट ठरला आहे. वरुण प्रत्येक वेळा अभिनय करताना भूमिका जगत असतो. त्यामुळे त्याच्या भूमिकेला न्याय द्यायला तो यशस्वी ठरतो. या चित्रपटामध्येही वरुणने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘ढिश्युम’, ‘एबीसीडी -२’, ‘दिलवाले’, ‘जुडवा २’ हे चित्रपट त्याचे गाजले आहेत.

३. चित्रपटाचं करण्यात आलेलं प्रमोशन – सुई धागासाठी चित्रपटातील प्रत्येक टीम मेंबरने मेहनत घेतली असून चित्रपटाचं जोरदार प्रदर्शन केलं आहे. चित्रपटाचं करण्यात आलेलं प्रमोशन पाहून अनेक प्रेक्षकांची पावले आपोआप चित्रपटगृहाकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे.

४. बिग बजेट चित्रपट – गेल्या आठवड्यामध्ये मनमर्जिया आणि बत्ती गुल मीटर चालू हे चित्रपट सरासरी कमाई करु शकले. त्यानंतर सुई धागा हा बिग बजेट चित्रपट असून त्याच्याबरोबर अन्य कोणताही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल अधिक आहे.

५. चित्रपटाच्या कथानकासाठी – या चित्रपटाच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’चा प्रचार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समाजातील काही महत्वाच्या घटकांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याजोगा असल्याचं दिसून येत आहे.