बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. नैराश्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या प्रकरणातील एक चकित करणारा प्रकार विकिपिडिया पेजच्या माध्यमातून समोर आला आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वीच त्याच्या विकिपिडिया पेजवर त्याला मृत घोषित केलं होतं. असा दावा सोशल मीडियाव्दारे केला जात आहे.

अवश्य पाहा – ‘ऑस्कर’मध्येही घराणेशाही? हृतिक आणि आलियाला अ‍ॅकेडमी अवॉर्डचे आमंत्रण

पोलिसांच्या रिपोर्टनुसार सुशांतने १०च्या आसपास फळांचा रस घेतला होता. त्यानंतर एक दिड तासांनी त्याने आत्महत्या केली. परंतु चकित करणारी बाब म्हणजे त्याच्या विकिपिडिया पेज वर नऊ वाजताच कोणीतरी सुशांतचा मृत्यू झाल्याचं लिहिलं होतं. सुशांतचा मृत्यू होणार आहे हे कोणाला माहित होतं? हा प्रश्न सोशल मीडियाद्वारे आता पोलिसांना विचारला जात आहे. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी CBI ने करावी अशी मागणी देखील केली जात आहे.

अवश्य पाहा – “जय जय महाराष्ट्र माझा”; पूजा भट्टनं केलं लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं कौतुक

सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.