25 February 2021

News Flash

नातीसोबत बिग बी लवकरच खेळणार ‘केबीसी’

छोट्या पड्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला रिअॅलिटी शो ‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

अमिताभ बच्चन आणि त्यांची नात आराध्या

छोट्या पड्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला रिअॅलिटी शो ‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसा जिंकण्याची संधी देणारा हा शो लोकप्रिय ठरण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांचं सूत्रसंचालन. हा खेळ खेळण्यासोबतच त्यांच्याशी भेटायला मिळणे ही स्पर्धकांसाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट ठरते. केबीसीचा दहावा सिझन लवकरच सुरू होणार असून आता बिग बींनी नात आराध्यासोबतही हा खेळ खेळणार असल्याचं सांगितलं.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आणि बिग बींची नात आराध्या केबीसीच्या सेटवर हजेरी लावणार का असा प्रश्न त्यांना एका पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आला. तेव्हा आराध्या या शोसाठी अजून लहान असून ती सेटवर येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण ही कल्पना अत्यंत चांगली असून घरी फावल्या वेळात तिच्यासोबत केबीसीचा प्रश्नोत्तरांचा खेळ नक्की खेळणार, असं ते म्हणाले. ‘आराध्या अजून लहान आहे. पण तिला या शोबद्दल बरीच माहिती आहे. शोची सिग्नेचर ट्यून तिला फार आवडते,’ असं बिग बींनी सांगितलं.

वाचा : ‘या’ दोन कलाकारांसोबत काम करण्याची बिग बींनाही वाटते भीती

‘कौन बनेगा करोडपती’चा दहावा सिझन येत्या ३ सप्टेंबरपासून सुरू होत असून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर तो प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 1:06 pm

Web Title: will soon play kaun banega crorepati with aaradhya said amitabh bachchan
Next Stories
1 Asian Games 2018: भारताचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलताना अमिताभ म्हणतात…
2 ‘या’ दोन कलाकारांसोबत काम करण्याची बिग बींनाही वाटते भीती
3 नताशा नव्हे, तर वरुणचं पहिलं प्रेम आहे…
Just Now!
X