ड्वेन जॉन्सन हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अभिनयसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ड्वेनला ‘द रॉक’ म्हणून ओळखले जायचे. तो WWE मधील सुपरस्टार रेसलर होता. खरं तर कुठलेही बॅकग्राउंड नसताना केवळ WWEमधील लोकप्रियतेमुळेच त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु WWEचा हा बेताज बादशाह केवळ डिप्रेशनमुळे रेसलिंग करायला गेला होता. होय हे खरं आहे, आज ड्वेन जॉन्सन उर्फ रॉकचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने पाहुया काय होता तो किस्सा?

 

View this post on Instagram

 

The hype is real. Excited to announce we’re bringing sports back!  Mark your calendars – on MAY 25th, the @NBCTitanGames RETURNS as the only athletic competition series currently slated for network television for SUMMER 2020.  Featuring our front line heroes – as the athletes I chose are nurses, doctors, veterans, teachers and everyday people – the baddest and the strongest we could find.  But here’s the cool twist, I’ve also brought in the best of the best – from Olympic gold medalists, to @NFL stars to @UFC Champs.  Join us this MEMORIAL DAY on @NBC for our EPIC 2 HOUR KICK OFF EVENT of incredible athletic competition for the summer! Let’s the #TitanGames begin!  @SevenBucksProd @ASmithCoProd #sportsareback #finally

A post shared by therock (@therock) on

सहा वर्षांपूर्वी ‘फ्यूरियस 7’ या चित्रपटाच्या निमित्ताने सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ड्वेन जॉन्सनने ‘द रॉक’ होण्यामागचा किस्सा सांगितला होता. त्या वेळी ड्वेन २० वर्षांचा होता. हायस्कूलमध्ये शिकत असताना त्याला अमेरिकन फुटबॉल खेळण्याची हौस होती. कॅनडा संघातर्फे त्याने आपल्या फुटबॉल करिअरची सुरुवात देखील केली होती. परंतु काही सामन्यांनंतर त्याला टीममधून बाहेर करण्यात आले. पुन्हा त्याची कधीही निवड झाली नाही. या घटनेमुळे ड्वेन आतुन पुर्णपणे तुटला होता. तो डिप्रेशनमध्ये गेला होता. स्वत:चा राग व्यक्त करण्यासाठी त्याने रेसलिंग करण्यास सुरुवात केली. पुढे त्याचा रागच त्याला WWE पर्यंत घेऊन गेला. या शोमध्ये त्याला द रॉक म्हणून ओळखले जाऊ लागले. आज द रॉक म्हटले की WWEचे वातावर उत्साहित होते परंतु या उत्साहामागे ड्वेनच्या अर्धवट राहिलेल्या इच्छा होत्या. खऱ्या आयुष्यात अर्धवट राहिलेल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी रॉकने चित्रपटांचा रस्ता स्विकारला. आणि आज तो हॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.