04 August 2020

News Flash

‘यारियाँ’ फेम अभिनेत्री राकूल प्रित सिंगची पर्स चोरट्यांनी पळवली

'यारियाँ' या म्युझिकल हिट चित्रपटातील अभिनेत्री राकूल प्रित सिंगला बँकॉकमध्ये चोरीच्या प्रकरणाला सामोरे जावे लागले.

| June 5, 2014 06:18 am

‘यारियाँ’ या म्युझिकल हिट चित्रपटातील अभिनेत्री राकूल प्रित सिंगला बँकॉकमध्ये चोरीच्या प्रकरणाला सामोरे जावे लागले.
राकूलने दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकमध्ये आपल्या मित्रपरिवारासोबत फिरत असताना एका सिग्नलवर बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी राकूलच्या हातातील पर्स मोठ्या चलाखीने पळवून नेली. या पर्समध्ये जवळपास लाखभर रूपयांच्या वस्तू असल्याचे राकूलने सांगितले. यामध्ये तिचा कॅमेरा, दोन मोबाईल्स आणि ६० हजार रुपये रोकड स्वरूपात होते. तसेच डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि ग्रीन कार्डही चोरीला गेले आहे.
हा प्रकार घडल्यानंतर वेळ न दवडता राकूल प्रितने नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2014 6:18 am

Web Title: yaariyan actress rakul preet singh robbed in bangkok
Next Stories
1 दीपिका पदुकोणकडून चित्रपटासाठी मिळणाऱ्या मानधनात वाढ
2 ‘सुबह सुबह’ची प्रसिद्धी करण जोहर करणार
3 ताऱ्यांची तारेवरची कसरत!
Just Now!
X