बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि विक्रांत मेसी यांचा ‘गिन्नी वेड्स सनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर गाणे चर्चेत आहे. या गाण्यामधील विक्रांत आणि यामी यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

यामीच्या ‘गिन्नी वेड्स सनी’ चित्रपटातील ‘लोल’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे पायल देवने कंपोज केले असून देव नेगीने गायले आहे. तसेच हे गाणे कुणाल वर्माने लिहिले आहे. सध्या हे गाणे चर्चेत आहे.

या गाण्यात यामी अतिशय सुंदर दिसत आहेत. तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच हे गाणे एका लग्न सोहळ्यातील असल्याचे दिसत आहे. गाण्यातील यामी आणि विक्रांतचा डान्स पाहण्यासारखा आहे.

‘गिन्नी वेड्स सनी’ हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती विनोद बच्चन यांनी केली आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि विक्रांत मेसी यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने यामी आणि विक्रांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.